गो शाळेला चारा वाटप
सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला -शिलाताई शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राला सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मिळाला आहे. गोर-गरीबांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाने शेतकरी, गोरगरिब जनता सुखावली असून, त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम सुरु असल्याचे प्रतिपादन माजी महापौर शिलाताई शिंदे यांनी केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पांजरपोळ येथील गो शाळेला चारा वाटप करण्यात आले. यावेळी माजी महापौर शिंदे बोलत होत्या. याप्रसंगी संग्राम शेळके, ओंकार शिंदे, शशांक महाले, आनंद शेळके, बाबू काकडे, सागर गायकवाड, प्रणिल शिंदे आदी उपस्थित होते.
पुढे माजी महापौर शिंदे म्हणाल्या की, हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा राष्ट्रभक्तीचा वैचारिक वारसा एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहे. सर्व नागरिकांच्या कल्याणाचा विचार केला जात असल्याचे, त्या म्हणाल्या. तर नगर शहरात सर्वसामान्य महिलेला शिवसेनेचा महापौर करताना त्यांची महत्त्वाची राहिलेली भूमिका व त्यावेळी शहर विकासाला निधी मिळवून देण्यासाठी त्यांच्या योगदानाच्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
