चला हवा येऊ द्या फेम डॉ. निलेश साबळे यांची उपस्थिती
गुणवत्तेला योग्य मार्गदर्शनाची साथ मिळाल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य घडते -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुणवत्तेला योग्य मार्गदर्शनाची साथ मिळाल्याने विद्यार्थी आपले भवितव्य घडवितात. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे स्थान दिले आहे. गुरु हा मुलांचे भवितव्य घडविताना समाज देखील घडवित असतो. या स्पर्धेच्या युगात गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेचे माहेरघर असलेल्या कोटा येथून देशभर पसरलेल्या बंसल क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
कोटाच्या (राजस्थान) धर्तीवर शहरात सुरु झालेल्या जेईई, नीट तसेच इतर स्पर्धा परीक्षेचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार्या बंसल क्लासेसच्या टिळक रोड येथील दुसर्या शाखेचा शुभारंभ चला हवा येऊ द्या फेम डॉ. निलेश साबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, बंसल क्लासेसचे मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी, ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सतीश सोनवणे, उद्योगपती नरेंद्र बाफना, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अभय आगरकर, संभाजी कदम, निखिल वारे, अॅड. धनंजय जाधव, सुरेंद्र गांधी प्रमुख, अकॅडमीचे संचालक एस.एस. कादरी पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, शहरातील विद्यार्थ्यांना कोटा सारख्या ठिकाणी न जाता त्या धर्तीवर गुणवत्तापुर्ण शिक्षण आपल्या शहरात मिळणार आहे. शिक्षणाने मुलांचे भवितव्य घडविण्याचे बंसल क्लासचे उपक्रम कौतुकास्पद असून, शिक्षणाबरोबरच त्यांचे सामाजिक योगदान देखील प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राजस्थानी मल्टीस्टेट व बंसल क्लासच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ज्येष्ठ समाजसेवक स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरातील गरजूंसाठी मोफत जेवणाच्या फिरते अन्न छत्रालयाचा शुभारंभ करण्यात आला. शाखा व्यवस्थापक प्रा. संजय सुर्यवंशी व डॉ. रिद्धी पंचाल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

चला हवा येऊ द्या फेम डॉ. निलेश साबळे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात गुणवत्ता महत्त्वाची असून, गुणवत्तेने विद्यार्थी सर्व क्षेत्रात चमकू शकतो. शिक्षण हा भवितव्याचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले. अकॅडमीचे संचालक एस.एस. कादरी यांनी प्रास्ताविकात शिक्षणासाठी नावाजलेल्या मोठ्या शहरातील ज्ञान गंगा आपल्या शहरात बंसलाच्या माध्यमातून आली आहे. विद्यार्थ्यांनी संधीचे सोन करुन आपले भवितव्य घडविण्याचे त्यांनी आवाहन केले.
चंदुलालजी बियाणी म्हणाले की, संस्कारक्षम व गुणवत्तापुर्ण शिक्षणाने विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसीत करण्यास बंसल क्लास कटिबध्द आहे. अनेक विद्यार्थी या क्लासमधून घडले आहेत. मुलांवर अपेक्षेचे ओझे न लादता, त्यांच्यातील क्षमता पाहून त्यांना भविष्याच्या दृष्टीकोनाने योग्य दिशा देण्याचे कार्य केले जात असल्याचे सांगून या क्लासच्या शाखा ग्रामीण भागात सुरु करण्याचा संकल्प व्यक्त केला.
बंसल क्लासचे महाराष्ट्र स्टेट हेड विष्णू घुगे यांनी विद्यार्थी आणि पालकांसाठी फास्ट ट्रॅक बॅच, ब्रिज कोर्स आणि शून्य टक्के व्याज दर या योजना आनल्या असून, याचा लाभ घेण्याचे सांगितले. बंसल क्लासेसचे एम.डी. रामेश्वर बांगड, सी.ई.ओ प्रा.कैलास घुगे, स्टेट हेड प्रा. विष्णू घुगे, यांनी नवीन शाखेला शुभेच्छा दिल्या.
