साईनाथ युवा प्रतिष्ठान व जय अंबे ग्रुप व किरण मामा शेटे याच्या वतीने जिल्हा रुग्णालयात फळांचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात कै. धर्मवीर जगदीश भोसले यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. साईनाथ युवा प्रतिष्ठान व जय अंबे ग्रुपच्या वतीने अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
किरण (मामा) शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले.
या वेळी युवा नेते शिवसेनेचे ओंमकार सातपुते, भाजप युवा मोर्चाचे ओंमकर लेंडकर, समीर गवळी, अमित लढा,अशोक टिमकारे, स्वप्निल व्यवहारे, शिवाजी तनपुरे, चंद्रकांत काळे, मयूर जाधव, प्रसाद भोसले, मकरंद जाधव, जालिंदर हंबर्डे, दीपक जुम्मीवाले, ऋषिकेश वाघमारे, संजय शिंगटे, सुरेश शेटे, आकाश लोखंडे, सिद्धार्थ कांकरिया आदी उपस्थित होते.
सचिन जाधव यांनी कै. धर्मवीर जगदीश भोसले यांच्या पुण्यतिथीच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करुन जयंती-पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरे झाल्यास गरजूंना आधार मिळणार असल्याचे सांगितले.
