चव्हाण यांचे भालसिंग यांच्या वतीने अभिष्टचिंतन
अहमदनगर (प्रतिनिधी)- एस.टी. को ऑपरेटिव्ह बॅक एम्प्लॉईज युनियनच्या कर्मचारींचे कुशल नेतृत्व शरद चव्हाण असून, त्यांनी कर्मचार्याच्या हितासाठी कार्य केले. त्यांचे कार्य सर्वांच्या स्मरणात दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे प्रतिपादन विजय भालसिंग यांनी केले.
एस.टी. को ऑपरेटिव्ह बॅक एम्प्लॉईज युनियनच्या माजी संघटक सचिव व कमिटी सल्लागार शरद चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भालसिंग बोलत होते.
भालसिंग पुढे म्हणाले की, सर्वाचे लाडके व्यक्तीमत्त्व शरद चव्हाण यांना युनियनचे अध्यक्ष मा.खा. आंनदराव अडसूळ साहेब व युनियनचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी साहेब यांनी त्याच्या कार्याची पावती म्हणून चव्हाण यांना युनियनचे संघटक सचिव पद दिले होते. त्यांनी एक विश्वासू सहकारी म्हणून आपली छबी निर्माण करुन चांगल्या पध्दतीने कार्य केले. शरद चव्हाण यांनी सेवानिवृत्तीनंतरही युनियनची व कर्मचार्याची नाळ तुटू दिली नाही. आजही ते युनियनच्या कमिटीवर सल्लागारपदी काम करीत आहेत. सर्व एस.टी. बॅक कर्मचार्यांना बरोबर घेवून चालणारे ते नेतृत्व असल्याचे त्यांनी सांगितले. तर शरद चव्हाण उर्फ दादा यांना तमाम महाराष्ट्रातील एस.टी. बॅक कर्मचार्याच्या वतीने वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा भालसिंग यांनी दिल्या.