महाराष्ट्र भूषण आदर्श वस्ताद पुरस्कार मिळाल्याबद्दल पद्मश्री पवार यांच्या हस्ते झाला सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पै. नाना डोंगरे यांना महाराष्ट्र भूषण आदर्श वस्ताद पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. हिवरे बाजार येथे झालेल्या काव्य संमेलनात पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पै. डोंगरे यांचा सत्कार पार पडला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक खासेराव शितोळे, मेधाताई काळे, ज्ञानदेव पांडूळे, शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राज्य संघटक शर्मिला गोसावी, सुनील गोसावी, कवी बाळासाहेब अमृते, सुभाष सोनवणे, उद्योजक उध्दवराव अमृते, गीताराम नरवडे आदी उपस्थित होते.
कुस्ती क्षेत्राला चालना देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय किर्तीचे मल्ल घडविणार्या वस्तादांना नुकतेच जय मल्हार फाउंडेशनच्या वतीने पुरस्काराने गौरविण्यात आले. पै. नाना डोंगरे यांनी कुस्ती क्षेत्रात अनेक नामवंत मल्लांना मार्गदर्शन करुन घडविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करुन मिळालेल्या पुरस्काराबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.