• Wed. Feb 5th, 2025

विरोध केल्याने सैनिक बँकेतील व्यवहारेंचा गैरकारभार उघड -सुदाम कोथिंबीरें

ByMirror

Feb 12, 2022

संजय कोरडेंमुळेच संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत चेअरमन शिवाजी व्यवहारे, मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत त्यांच्या नियमबाह्य कामकाजाच्या सहकार खात्याकडे गेली तीन वर्षांपासून तक्रारी करत असल्यानेच सहकार विभागाकडून चौकशी झाली असून, त्या चौकशीत संचालक मंडळ दोषी असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे व्यवहारे, कोरडे यांच्या मनमानी कारभाराला आमच्या विरोधामुळेच लगाम बसला असल्याचा दावा सैनिक सहकारी बँकेचे संचालक सुदाम कोथिंबीरे यांनी केला आहे.
सैनिक बँकेत व्यवहारे, कोरडे यांनी आम्ही विरोध करणारे तीन चार संचालक वगळता, अन्य संचालकांना बरोबर घेत गैरकारभार केला. त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना बँक सेवेत घेतले. त्याला मी विरोध करत उच्च न्यायालयात आव्हान दिले. नातेवाईक सभासद केले. त्या विरोधात सहकार मंत्र्याकडे आपिल दाखल करत स्थगिती मिळवली. न्यायालयीन खर्चाची तक्रार केली. गुन्हे दाखल झालेल्या कर्मचार्‍यांना नियमबाह्य अ‍ॅडव्हान्स दिला. तो उघड करत तक्रार केली. जादा वसुली खर्च, फर्निचर व नूतनीकरण खर्च अनावश्यक टाकला, त्या संबधीही तक्रार केली. कोरडे, व्यवहारे यांच्या कारभाराला गेली चार वर्षे विरोध केला, म्हणून चौकशी लागली गेली. चौकशीत चौकशी आधिकारी यांनी तक्रारदारानां विश्‍वासात न घेता सरसकट संचालक मंडळ दोषी धरले आहे. मात्र वरील सर्व मुद्याना मी कायम विरोध करूनही सरसकट सर्व मंडळाला दोषी धरले असून, मी सहकार आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे कोथिंबीरे यांनी म्हंटले आहे.


     कारभार स्वच्छ म्हणता तर चौकशीत दोषी कसे !

सुदाम कोथिंबिरे , बबन दिघे, यांनी सतत कोरडे, व्यवहारे यांच्या गैरकामकाजास विरोध केला, म्हणून चौकशी लावण्यात यश आले. चौकशीत मंडळ दोषी धरले आहे. असे असताना चेअरमन प्रसार माध्यमातून आम्ही राजकीय व निवडणुकीच्या हेतूने आरोप करत असल्याचे सांगत आहेत. बँकेतील गैरकारभार चौकशीत समोर आल्याने चेअरमन, मुख्यकार्यकारी आधिकारी अस्वस्थ आहेत. सभासद व आम्ही त्यांच्यावर कुठलाही आरोप करीत नाही. चौकशी अहवालात जे आहे, ते मांडतोय. तुमचा कारभार जर स्वच्छ होता, तर चौकशीत दोषी कसे आहात? असाही सवाल संचालक सुदाम कोथिंबीरे व बबन दिघे यांनी केला आहे.

संजय कोरडेनां हटवा -कोथिंबिरे

सैनिक सहकारी बँकेत मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे हे गेली पंधरा वर्षांपासून एकतर्फी कारभार करत आहेत. त्यांनी अनेक गैरव्यवहार केले. त्यातून त्यांच्यावर आर्थिक गुन्हे दाखल आहेत. संचालकांना चुकीची माहिती देत ठराव मंजूर करून घेतल्याने संचालक मंडळे अडचणीत आले आहे. त्यामूळे संजय कोरडेनां मुख्यकार्यकारी आधिकारी पदावरून त्वरित हटवा, अशी मागणी रिजर्व बँकेकडे करणार आसल्याचे संचालक कोथिंबीरें व दिघे यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *