महाराष्ट्र राज्य कमिटीवर एकमताने निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची अखिल विश्व वारकरी परिषदच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भालसिंग यांनी जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असताना केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य कमिटीवर एकमताने निवड करण्यात आली आहे.
अखिल विश्व वारकरी परिषदेचे प्रदेश अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज सातपुते यांनी भालसिंग यांच्या नियुक्तीची घोषणा करून त्यांना नियुक्ती पत्र दिले. तर भालसिंग यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
वाळकी (ता. नगर) येथील विजय भालसिंग यांचे सामाजिक व धार्मिक क्षेत्रांत कार्य सुरु आहे. ते एस.टी. बँकेत कार्यरत असून, विविध उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक योगदान देत आहेत. भालसिंग यांनी संघटनेच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन समाजातील प्रश्न सोडविण्यास कार्यरत राहणार आहे. वारकरी सांप्रदायाचा प्रचार व प्रसार राज्यभर करुन अखिल विश्व वारकरी परिषदेचे संपूर्ण राज्यात संघटन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल अखिल विश्व वारकरी परिषदेचे राज्य कार्यकारणी मंडळाच्या सदस्यांनी भालसिंग यांना शुभेच्छा दिल्या. तर या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
