• Fri. Jan 30th, 2026

वाडियापार्कला 4 फेब्रुवारी रोजी रंगणार जिल्हास्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा

ByMirror

Jan 24, 2023

खेळाडूंना सहभागी होण्याचे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुलमध्ये शनिवार दि.4 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय सब ज्युनिअर (अ‍ॅथलेटिक्स) मैदानी स्पर्धा रंगणार आहे. अहमदनगर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध वयोगटात होणार्‍या या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे, प्रा.आर.पी. डागवाले, प्रा. सुनील जाधव, सचिव दिनेश भालेराव यांनी केले आहे.


सकाळी 10 वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. 6, 8 , 10 , 12 व 14 वयो गटातील मुला, मुलींच्या रनिंग, लांब उडी, शॉट पूट, रिले, शटल रिले या मैदानी स्पर्धा होणार आहे. यामधील प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंना गुणवत्ता प्रमाणपत्र व मेडल दिला जाणार आहे. व सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 8, 10 व 12 वर्षे वयोगटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.

4 व 5 मार्च रोजी कोल्हापूर येथे होणार्‍या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. 14 व 6 वर्षे आतील मुला, मुलींच्या फक्त जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे. त्यांच्या राज्य स्पर्धा होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.


स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरु झाली असून, 4 फेब्रुवारी सकाळी 9 वाजे पर्यंत खेळाडूंना ऑफ लाईन पध्दतीने नोंदणी करता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व खेळाडूंना ओरीजनल जन्म दाखला व आधार कार्ड सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी दिनेश भालेराव (नगर शहर) 9923837888, राहुल काळे (लोणी) 9975320837, संदीप घावटे (श्रीगोंदा) 9767201269, सुजीत बाबर (शिर्डी) 7507681726, रमेश वाघमारे (भिंगार) 9271233662, जगन गवादे (संगमनेर) 9881328186, रावसाहेब मोरकर (पाथर्डी ) 9657565456, राघवेंद्र धनलगडे (जामखेड) 8975600538, अजित पवार (कोपरगाव) 8830862877 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *