• Thu. Mar 13th, 2025

लोककलावंत (गोंधळी) संजय जाधव यांचे निधन

ByMirror

Aug 4, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील लोककलावंत (गोंधळी) संजय भैरवनाथ जाधव यांचे नुकतेच ह्रद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षाचे होते.


गोंधळी म्हणून ते जिल्ह्यात प्रसिध्द होते. जागरण-गोंधळ, नवरात्र मध्ये देवीचे गाणे व विविध धार्मिक गीत सादर करणारे ते लोककलावंत होते. त्याचबरोबर धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, दोन भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *