संपूर्णा सावंत यांची अध्यक्षपदी निवड
सामाजिक क्षेत्रात महिलांचे योगदान परिवर्तनाची नांदी -रजनीताई गोंदकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात महिलांचे योगदान परिवर्तनाची नांदी ठरत आहे. कौटुंबिक जबाबदार्या सांभाळून महिला निस्वार्थ भावनेने लीनेसच्या माध्यमातून कार्य करत आहे. लीनेस क्लबच्या कार्याने सामाजिक चळवळीला बळ मिळणार असल्याचे प्रतिपादन लीनेस क्लबच्या चार्टर्ड डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट रजनीताई गोंदकर यांनी केले.
शहरात सामाजिक कार्य करणार्या महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या लीनेस क्लब ऑफ अहमदनगर मिडटाउनचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी गोंदकर बोलत होत्या. रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी माजी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट छायाताई राजपूत, नीलम परदेशी, माजी महापौर शीलाताई शिंदे, सुरेखाताई कदम आदींसह लीनेस क्लबच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या पदग्रहण सोहळ्यात संपूर्णा सावंत यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तर सचिवपदी स्वाती जाधव, खजिनदार पदी कल्पना ठुबे यांची निवड करुन त्यांना पदाची सूत्रे प्रदान करत शपथ देण्यात आली.
अध्यक्षा संपूर्णा सावंत म्हणाल्या की, लिनेस ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. अनेक महिला या क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असून, शहरात लिनेसच्या माध्यमातूनही समाजातील दुर्बल घटकांना प्रवाहात आनण्यासाठी कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माजी अध्यक्षा राजश्री राजश्री शितोळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शारदा पवार, माधवी मांढरे, अर्चना माणकेश्वर, डॉ. दिपाली अनुभुले, मायाताई जगताप, पल्लवी जाधव, प्रीती मुथा, सीमा शेळके, वंदना निघुट, रेणू दौड आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम परदेशी यांनी केले. आभार सुनंदा तांबे यांनी मानले.