महात्मा फुलेंनी प्रवाहाविरोधात जाऊन क्रांती घडवली -अमित काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 132 व्या पुण्यतिथी निमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत पाटील, आयटी सेल जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, युवक तालुका सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, रोहित कांबळे, विक्रम चौहान, राहुल विघावे, कृष्णा भिंगारदिवे, सलीम शेख, श्याम साळवे आदी उपस्थित होते.
रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, महात्मा फुले यांनी समतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली. समाजात समता आणि रुढी, परंपरा दूर होण्यासाठी त्यांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. कुटुंबाचा उद्धार पुरूषांपेक्षा महिला करू शकतात, हा दूरदृष्टीकोन ठेऊन त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी करुन दिली. प्रवाहाविरोधात जाऊन त्यांनी क्रांती घडवली असल्याचे त्यांनी सांगितले.
