अहमदनगर सिटी रायफल अॅण्ड पिस्तोल शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय रायफल स्पर्धेत शहरातील अहमदनगर सिटी रायफल अॅण्ड पिस्तोल शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या 6 खेळाडूंची निवड करण्यात आली असून, हे खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
केरळ राज्यात त्रिवेंद्रम या ठिकाणी 20 नोव्हेंबर ते 08 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय रायफल स्पर्धा होणार आहे. यामध्ये पीप साईट रायफल मध्ये ओम सानप, यश कदम, पार्थ छाजेड, गौरव घोडके, विराज चव्हाण, मोहित गवई या खेळाडूंची निवड झाली आहे. या खेळाडूंचा महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल वाडियापार्क क्रीडा संकुल येथे सत्कार करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या खेळाडूंचे आमदार संग्राम जगताप, क्रीडा अधिकारी दीपाली बोडखे, घनश्याम सानप, संजय साठे, रविंद्र कदम यांनी अभिनंदन केले. सदर खेळाडू मुख्य प्रशिक्षक छबुराव काळे, प्रशिक्षक अलीम शेख, ऋषिकेश दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
