आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत नगरचा खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने सुवर्ण पदक पटकाविले. नुकतेच तामिळनाडू येथील के.एस.पी. शैक्षणिक संकुल नामक्कल डिस्ट्रिक्ट (इरोड) येथे झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत एकलव्य तायक्वांदोचा खेळाडू असलेल्या पिसाळ याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना 41 किलो वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन सुवर्णमय कामगिरी केली. त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर दुसरी सोनाली गीते हिने 22 किलोच्या सबज्युनियर गटात रौप्य पदकाची कमाई केली.

या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात अहमदनगरच्या पाच खेळाडूंची निवड झाली होती. त्यात या दोन्ही खेळाडूंनी उत्तम कामगिरी करुन पदकांची कमाई केली. तसेच अदिती धावड, कार्तिक काळे, प्रतिक शिंदे यांनी देखील उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. या सर्व खेळाडूंना अकॅडमीचे प्रशिक्षक गणेश वंजारे, नारायण कराळे, अल्ताफ खान, मंगेश आहेर, योगेश बिचितकर, सचिन मरकड, तेजस ढोबळे, मयूर आडगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल खेळाडूंचे एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे, प्रा. माणिक विधाते, तायक्वांदो असोसिएशनचे सचिव घनश्याम सानप, खजिनदार नारायण कराळे, सहसचिव दिनेश गवळी, एन. आय.एस. कोच मच्छिंद्र साळुंखे, पोलीस कोमल शिंदे, अॅड. वैष्णवी ढगे, शिल्पा पगारे, राष्ट्रीय पंच प्रिया शिंदे, बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अॅड. गजेंद्र पिसाळ, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका स्मिता पिसाळ, बाळासाहेब धावड यांनी अभिनंदन केले.
विराज हा केंद्रिय विद्यालय क्र. 1 चा विद्यार्थी आहे. त्याला विद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक परदेशी सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक यांचेही मार्गदर्शन लाभले. जिल्हा बँकेचे संचालक व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अंबादासजी पिसाळ यांचा तो नातू आहे. विराजच्या मार्गदर्शनाखाली त्याचा छोटा भाऊ क्षितिज पिसाळ हा देखील तायक्वांदो खेळत आहे.
