पोलिस दलात प्रमाणिकपणे देत असलेली शेख यांची सेवा कौतुकास्पद -अरुण खिची
अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलिस दलात उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त अल्ताफभाई शेख यांना पोलीस उपनिरिक्षकपदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण खिची, जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन चव्हाण, जिल्हा सचिव आदित्य कासवा, जिल्हा उपाध्यक्ष मनिष सुरग, रोहित संबळे आदी उपस्थित होते.
अरुण खिची म्हणाले की, सामाजिक भावनेने अल्ताफभाई शेख पोलिस दलात प्रमाणिकपणे देत असलेली सेवा कौतुकास्पद आहे. पोलीस खात्यामध्ये 38 वर्षे सेवा देताना त्यांनी विविध पुरस्कार मिळवले आहेत. गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी बद्दल महाराष्ट्र पोलिस दलातील सर्वोच्च पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्जुन चव्हाण म्हणाले की, कर्तव्य दक्ष पोलिस कर्मचारीची राष्ट्रपती पदक पुरस्कार ते उपनिरिक्षकपदी बढतीने शेख यांनी केलेल्या प्रामाणिकपणाची पावती आहे. त्यांचे योगदान जनहिताचे असल्याचे त्यांनी सांगितले.