जिल्हाधिकारी कार्यालया समोर एनपीएस हटावची घोषणा
प्रमुख सरकारी कार्यालयात द्वार सभा सुरु
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, जिल्हा शाखा अहमदनगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर एनपीएस हटावची घोषणा देऊन जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संपाचा इशारा शासनाला देण्यात आला आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, भाऊसाहेब डमाळे, विलास पेद्राम, विजय काकडे, ज्ञानेश्वर कांबळे आदींसह कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून जुनी पेन्शनसाठी निर्णायक आंदोलन करण्यासाठी राज्यभरातील कर्मचार्यांची मानसिकता तयार करुन जागृती निर्माण करण्यासाठी व त्यांना एकजुट करण्याच्या उद्देशाने पाऊल टाकले जात आहे. या पार्श्वभूमीवर 21 ते 25 नोव्हेंबर पर्यंत एमपीएस हटाव सप्ताह सुरू करण्यात आलेला आहे. या सप्ताहातंर्गत प्रमुख सरकारी कार्यालयात द्वार सभा घेऊन एनपीएस हटाव मोहिमेचा प्रचार-प्रसार सुरु आहे.
लवकरच बेमुदत संपाची घोषणा केली जाणार असून, त्या दृष्टीकोनाने हे निर्णायक आंदोलन यशस्वी करण्याची तयारी सुरु करण्यात आलेली असल्याची माहिती अध्यक्ष सुभाष तळेकर व सरचिटणीस रावसाहेब निमसे यांनी दिली.
