• Fri. Sep 19th, 2025

राक्षसवाडीच्या सरपंचाचे पद रद्द

ByMirror

May 24, 2023

शासकीय जागेवरचे अतिक्रमण भोवले

तक्रारीवरुन जिल्हाधिकारी यांनी ठरविले अपात्र

अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे राक्षसवाडी (ता. कर्जत) येथील सरपंचला चांगलेच भोवले. नुकतेच जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी त्या सरपंचाला अपात्र ठरविल्याने त्याला सरपंच पदापासून मुकावे लागले आहे. विद्यमान सरपंच अपात्र ठरल्याची गावात चांगलीच चर्चा रंगली आहे.


गावातील दत्तात्रय पांडुरंग श्रीराम यांनी ग्रामपंचायतच्या सरपंच झालेल्या ताई धनंजय दिंडोरे यांच्या विरोधात शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधीकारी यांच्याकडे दाखल केली होती. दिंडोरे या ग्रामपंचायतीच्या 15 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. 1 मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षित जागेवरून सदस्य पदासाठी निवडून आलेल्या विद्यमान ग्रामपंचात सरपंच होत्या.


त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून घराचे बांधकाम केले व त्या जागेचा उपभोग घेत होत्या. या प्रकरणी तक्रार अर्जावरुन जिल्हाधीकारी यांनी चौकशी करून ताई दिंडोरे यांना अपात्र केले आहे. दरम्यान याबाबत गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेल्या अहवालानुसार दिंडोरे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार दिंडोरे यांचे सदस्य व सरपंच पद जिल्हाधिकारी यांनी रद्द केले. अर्जदाराच्या वतीने अ‍ॅड. गजेंद्र पिसाळ यांनी कामकाज पाहिले. त्यांना अ‍ॅड. अच्युत भिसे, अ‍ॅड. विशाल पांडुळे व निखिल चव्हाण यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *