विद्यार्थ्यांना फराळ व मिठाईचे वाटप
भाईचारा उपक्रमांतर्गत आदमी पार्टीचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील यतीमखाना बोर्डिंग स्कूल मध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने दिवाळी पाडवा व भाऊबीज साजरी करण्यात आली. भाईचारा उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मिठाई फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टीचे शहर संघटक प्रा. अशोक डोंगरे, कार्याध्यक्ष भरत खाकाळ, शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, यतीम खाना बोर्डिंग स्कूलचे संचालक शाकीर शेख, गुफरान शेख, बोर्डिंगच्या अधीक्षक आयेशा शेख, हारून शेख, दिलीप घुले, गणेश मारवडे, शबिल शेख, सुधीर कुलकर्णी, क्षीरसागर, ललवाणी आदीसह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहर संघटक प्रा. अशोक डोंगरे म्हणाले की, वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी यतीमखाना आधार ठरला असून, या घटकातील मुलांचे भवितव्य शिक्षणाने घडविण्याचे कार्य संस्था करीत आहे. या सामाजिक कार्यासाठी आम आदमी पार्टीचा देखील पुढाकार राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करून माणुसकीच्या भावनेने उपक्रम राबविल्याचे सांगितले. शहर अध्यक्ष राजेंद्र कर्डिले यांनी समाजाचे देणे लागते या भावनेने प्रत्येकाने आपल्या परीने जबाबदारी पेळवली पाहिजे. या संस्थेशी ऋणानूबंध निर्माण झाले असून, संस्थेला आम आदमी पार्टीचे नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले