• Thu. Mar 13th, 2025

माहेश्‍वरी समाजाच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार

ByMirror

Apr 25, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- माहेश्‍वरी समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी मनीष बाहेती व धर्म शाळा ट्रस्टच्या विश्‍वस्तपदी लालाशेठ धूत यांची नुकतीच नियुक्ती झाली. विविध सामाजिक संस्थांच्या वतीने बाहेती व धूत यांचा सत्कार करण्यात आला.


शेवगाव येथे झालेल्या सत्कार सोहळ्यास शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचारमंच, पवाज् ग्रुप, प्रवीण भाऊ भारस्कर मित्र मंडळ, वस्ताद ग्रुप, भारस्करवाडी मित्र मंडळ, वसीम भाई मुजावर मित्र मंडळ, पिंजारी मन्सूरी जमात आदी शेवगावच्या सामाजिक संस्थांनी बाहेती व धूत यांचा सन्मानपूर्क सत्कार केला. या कार्यक्रमासाठी प्रवीण भारस्कर, अशोक शिंदे, वेणु गोपाल धूत, राहुल बलदावा, तुषार लांडे, अमोल देशमुख, वसीम मुजावर, शफिकभाई शेख, प्रवीण भारस्कर, राहुल भारस्कर, राहुल भालेराव, रोहित प्रव्हाणे आदी उपस्थित होते.


बाहेती व धूत यांची झालेली निवड सर्व समाजाच्या दृष्टीने अभिमानास्पद असून, त्यांच्या माध्यमातून सेवा घडून समाजाला दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना बाहेती व धूत यांनी सत्कार सोहळ्याने भारावलो असून, काम करण्याची आनखी जबाबदारी वाढली असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *