काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी युवा वर्ग महत्त्वाची जबाबदारी उचलणार -मोसिम शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या काँग्रेसच्या दक्षिण मतदार संघ आढावा बैठकीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नियुक्ती करण्यात आली. युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांनी युवक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यावेळी महाराष्ट्र सहप्रभारी एहसान खान, जिल्हाध्यक्ष राजीव नागवडे, प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, प्रदेश सरचिटणीस दिपाली ससाणे, युवकचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, बाळासाहेब भंडारी, भिंगार ब्लॉक अध्यक्ष श्यामराव वाघस्कर, प्रशांत सिद्धांतकर, सागर इरमल, रियाज शेख, इरशाद शेख, नलिनी गायकवाड, सुनीता बागडे, विकास काळे, योगेश मित्रे आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवक काँग्रेसच्या अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्षपदी अकदस शेख, क्रीडा विभाग शहर जिल्हाध्यक्षपदी प्रवीण गीते, ब्लॉक उपाध्यक्षपदी आकाश लोखंडे, युवक काँग्रेस शहर जिल्हा सरचिटणीसपदी शिरीन बागवान, पूजा लोखंडे, तौफिक शेख यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमात नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख म्हणाले की, काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी युवा वर्ग महत्त्वाची जबाबदारी उचलणार आहे. युवकांचे संघटन करुन येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचे सर्वच उमेदवार विजयी करण्यासाठी युवक कटिबध्द राहणार आहे. समाजात काम करणाऱ्या युवकांना संधी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित युवा पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी युवकचे आलिम देशमुख, भुषण चव्हाण, योगेश काळे, शहेबाज बेग, अफान शेख, जुनेद बागवान, अरबाज बागवान, इमरान सय्यद, शहेबाज शेख, हजेब शेख, अन्सार सय्यद, रईस शेख, कैफ शेख, अली शेख, काशिफ बागवान, साहिल शेख, मोईन शेख, अमन शेख, ईज्जू शेख, अफजान शेख, अरशान शेख, जुनेद शेख, सोनू पठाण, आयन शेख, कैफ तांबोळी, फैज सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.