• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

महाराष्ट्र दिनी शहरात सातव्या राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धेचे आयोजन

ByMirror

Apr 23, 2023

ऐतिहासिक वस्तु संग्रहालय स्थापना दिनाचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व संशोधन केंद्र अहमदनगरच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र दिनी (दि.1 मे) ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व जागतिक मोडी लिपी प्रसार समितीच्या संयुक्त विद्यमाने सातव्या राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर या चार शहरात एकाच दिवशी आणि एकाच वेळी सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा आणि शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. मोडी लिपी प्रचारार्थ भव्य स्पर्धाचे हे सातवे वर्ष आहे. ही स्पर्धा 1 मे रोजी होणार असून, 29 एप्रिल पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सर्वच केंद्रावरील दोन्ही स्पर्धा गटातील सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रवेशपत्र हे केंद्रावरच भरावयाचा आहे. ऑनलाईन प्रवेशपत्र भरण्याची मुभा नाही. दूर अंतरावर रहाणारे स्पर्धेच्याच दिवशी अर्धा तास आधी येऊन प्रवेशपत्र भरू शकतील. पुस्तक विक्रेत्यांनाही मोडी विषयक पुस्तकांचे स्टॉल लावण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


स्पर्धकांनी स्वत:चे पेन, बोरू, टाक, पेन्सिल, खोड रबर, फुट पट्टी आणि धरावयास पॅड आणावे. स्पर्धकांस कागद पुरवले जातील. काळ्या शाईचा वापर अनिवार्य आहे. सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धेकरिता देवनागरी लिपीत उतारा दिला जाईल. तो मोडी लिपीत लिहावयाचा आहे. अक्षर चुका ग्राह्य धरल्या जातील. शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धेकरिता 1 शिवकालीन आणि 1 पेशवेकालीन कागद असेल. दोन्ही कागदांकरिता अर्धा-अर्धा तास दिला आहे.


स्पर्धेची ठिकाणे ही मुंबई- सावरकर स्मारक (विलास कडू 9869220223 / 022-24465877), पुणे- (परेश जोशी 9881104379), अहमदनगर- ऐतिहासिक वस्तु संग्रहालय (संतोष यादव 9372155455) आणि कोल्हापूर- (नवीनकुमार माळी (94200 39494) अशी असून, अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे दिलेल्या नंबरवर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *