अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने अभिनंदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- बीसीसीआय आयोजित मुश्ताक अली टी- 20 करंडक स्पर्धेसाठी अहमदनगरचा सुपुत्र अजीम काझी याची महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे.
जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप यांनी काझी याचे विशेष अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच असोसिएशनचे सहसचिव प्रा. माणिक विधाते, उपाध्यक्ष सुमतीलाल कोठारी, सचिव गणेश गोंडाळ यांनी देखील काझी याचे कौतुक करुन भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
मुश्ताक अली टी- 20 करंडक क्रिकेट स्पर्धेला 11 ऑक्टोंबर पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या निवड समितीने काझीची उपकर्णधारपदी निवड केल्याची घोषणा नुकतीच केली. महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदी निवड होणारा अहमदनगर शहरातील तो पहिला खेळाडू ठरला आहे.
आझीम काझी हा डावखुरा फलंदाज असून, तो डावखुर्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो. महाराष्ट्र संघाकडून अष्टपैलू खेळाडू विविध स्पर्धेत खेळताना त्याने आतापर्यंत तीन शतके झळकावून संघाला विजय मिळवून दिला आहे. तसेच त्याने एकूण 43 बळी देखील मिळवले आहे. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याची निवड समितीने उपकर्णधार म्हणून निवड केली आहे. काझी मुश्ताक अली टी- 20 करंडक मध्ये कर्नाटक, जम्मू-काश्मीर, मेघालय, केरळ या संघा विरोधात महाराष्ट्राचा उपकर्णधार म्हणून आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

