• Thu. Oct 16th, 2025

महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा गौरव

ByMirror

Apr 2, 2023

भाजपचे युवा कार्यकर्ते ओंकार लेंडकर यांचा उपक्रम

शहराच्या स्वच्छतेसाठी राबणार्‍या हातांचा सन्मानपूर्वक सत्कार प्रेरणादायी -महेंद्र (भैय्या) गंधे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर स्वच्छ ठेऊन नागरिकांचे आरोग्य जपण्याचे कार्य करणारे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते ओंकार लेंडकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.


बालिकाश्रम रोड, लेंडकर मळा परिसरात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा सत्कार सोहळा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक निखील वारे, अ‍ॅड. धनंजय जाधव, किशोर डागवाले, ज्ञानेश्‍वर काळे, महेश लोंढे, आकाश सोनवणे, भैय्या लेंडकर, अमोल शिंदे, त्रिदल सेवा संघाचे प्रवक्ते आठरे मेजर, राजेशाही उद्योग समूहाचे उजेफ सय्यद, साई अकॅडमीचे संचालक प्रा. जायभाये, प्रा. पिंपळे आदींसह लेंडकर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महेंद्र (भैय्या) गंधे म्हणाले की, युवकांनी समाजकारण व राजकारणाकडे वळण्याची गरज आहे. ओंकार लेंडकर यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असून, भविष्यात त्यांच्या माध्यमातून युवा नेतृत्व पुढे येणार आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी राबणार्‍या हातांचा सन्मानपूर्वक सत्कार करुन त्यांनी दाखवलेली कृतज्ञता प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.


ओंकार लेंडकर म्हणाले की, काही तासासाठी स्वच्छता अभियान राबवून काही व्यक्ती प्रसिध्दी मिळवतात. मात्र हे स्वच्छता कर्मचारी सातत्याने शहर स्वच्छतेसाठी व नागरिकांच्या आरोग्यासाठी योगदान देत असतात. त्यांच्या कार्याचा सन्मान व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दैनंदिन स्वच्छतेसाठी करत असलेल्या कामाची दखल घेऊन मिळालेल्या मान-सन्मानाने स्वच्छता कर्मचारी भारावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *