क्रेडिट अॅक्सिस बँकेची मिळवली शिष्यवृत्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने श्री शाहू विद्या मंदिर खडांबे (ता. राहुरी) येथील गुणवंत विद्यार्थिनी प्रणाली संजय कल्हापूरे हिचा क्रेडिट अॅक्सिस बँकेची शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. संस्थेचे सचिव जे.डी. खानदेशे व विश्वस्त जयंत वाघ यांनी या गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार केला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी देशमाने, पर्यवेक्षक जयसिंग नरोडे, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, संजय रोकडे, अविनाश रामफळे, संदीप बांगर, राहुल जाधव, गणेश कुर्हे, प्रसाद साठे, सिकंदर सय्यद, संजय कल्हापुरे, संतोष कार्ले, जी.आर. थोरात, बाळासाहेब मेहेत्रे आदी उपस्थित होते.
क्रेडिट अॅक्सिस बँकेच्या वतीने ग्रामीण भागात शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, या दृष्टीकोनाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. यावर्षी श्री शाहू विद्या मंदिर खडांबे (ता. राहुरी) येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कल्हापूरे हिला दोन वर्षासाठी 80 हजार रुपयाची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यामधून ही शिष्यवृत्ती दोनच विद्यार्थिनींना देण्यात आली असून, त्यापैकी कल्हापूरे ही एक ठरली आहे. यावर्षीचे चाळीस हजार रुपये तिच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे.
या गुणवंत विद्यार्थिनीचा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी देखील सत्कार केला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष र.हा. दरे, सहसचिव विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ. भापकर, विश्वस्त मुकेश मुळे, जयंतराव वाघ यांनी कल्हापूरे या विद्यार्थिनीचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
