हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम
स्वच्छता ही प्रशासनाची जबाबदारी नसून, नागरिकांचे कर्तव्य -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संत गाडगे महाराज यांची जयंती स्वच्छता अभियानाने साजरी करण्यात आली. भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्क व परिसराची हरदिनच्या सदस्यांनी स्वच्छता करुन कृतीतून गाडगे महाराजांना अभिवादन करुन स्वच्छ व सुंदर भारत घडविण्याचा संदेश देण्यात आला.

नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सविता शिंदे यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, विद्याताई मिसाळ, वृषभ जावळे, विकास निमसे, किशोर भगवाने, नामदेवराव जावळे, दिलीप गुगळे, संतोष हजारे, संतोष लुनिया, सर्वेश सपकाळ, बापूसाहेब तांबे, अशोक पराते, राजेंद्र शिंदे, अभिजीत सपकाळ, रमेश बोरा, अशोक भगवाने, सुनील नागपुरे, विकास भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, रामनाथ गर्जे, सिताराम परदेशी, सुमेश केदारे, विलास तोतरे, महेश सरोदे, अनंत सदलापूर, सिद्धूतात्या बेरड, सुनील थोरात, भाऊसाहेब गुंजाळ, नितीन कवडे, आदित्य बचाटे, राजू शेख, जालिंदर अळकुटे, अविनाश जाधव, शेषराव पालवे, सचिन कस्तुरे आदी ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, सार्वजनिक स्वच्छता ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नसून, नागरिकांचे देखील कर्तव्य आहे. युवकांसह नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वच्छतेला चळवळीचे स्वरुप दिल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होणार आहे. सार्वजनिक स्वच्छता ही एका दिवसा पुरती मर्यादित न ठेवता दररोज नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेची गरज आहे. ग्रुपच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व आरोग्य चळवळ वर्षभर सुरु असल्याची त्यांनी माहिती दिली.
या उपक्रमात नाशिक रोड येथील हास्य ग्रुपचे उमेश श्रीवास्तव, दीपक नागपुरे, उद्धव मंडलिक यांनी क्लबला भेट देऊन सुरु असलेल्या हरदिनच्या कार्याचे कौतुक करुन हास्य योगा घेतले. तर नाशिक येथे हरदिन मॉर्निंग ग्रुपप्रमाणे मोठ्या प्रमाणात नागरिकांना जोडून पर्यावरण संवर्धन व आरोग्य चळवळ उभी करण्याचा संकल्प व्यक्त केला.
