रयतेच्या कल्याणासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले -अभिजीत सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे अभिजीत सपकाळ, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे, रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, दीपक बडदे, अशोक पराते, सुभाष होडगे, मतीन सय्यद, सर्वेश सपकाळ, अच्युत गाडे, कैलास वाघस्कर, मच्छिंद्र भिंगारदिवे, जनाभाऊ भिंगारदिवे, सदाशिव मांढरे आदी उपस्थित होते.
अभिजीत सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले स्वराज्य उभे केले. जात, धर्म, पंथ न मानता त्यांनी सर्वांना न्याय देऊन, समता व बंधुत्व प्रस्थापित केली. परस्त्रीला माते समान वागणुक देऊन त्यांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला. त्यांचे विचार आज दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
