अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील पै. चंद्रभान बाळाजी सपकाळ यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (दि.30 डिसेंबर) निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. ते व्हीआरडीई चे सेवानिवृत्त कर्मचारी व कर्मचारी युनियनचे संचालक होते.
तर धार्मिक व सामाजिक कार्यामुळे ते सर्वांना सुपरिचित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांचे थोरले बंधू तर व्यापारी अजय व किरण सपकाळ यांचे ते वडिल होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भिंगार शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारी संध्याकाळी भिंगार येथील अमरधाममध्ये त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
