• Thu. Oct 16th, 2025

भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

ByMirror

Oct 31, 2022

चरणबध्द आंदोलनाचा तिसरा टप्पा

केंद्रातील भाजप सरकार विरोधात निदर्शने

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात आर एस एस प्रणित भाजप सरकार संविधानद्रोही कृत्य करत असल्याच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने चरणबध्द आंदोलनातंर्गत सोमवारी (31 ऑक्टोंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात भास्कर रणनवरे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, संजय कांबळे, सुरेश खरात, विनोद शिरसाठ, अशोक म्हस्के, एकनाथ गायकवाड, अशोक साळवे, रमेश गायकवाड, कन्हैय्या इट्टम, गणपत मोरे, संजय संसारे, धनवडे, ऍड. सिद्धार्थ, रामदास धनवडे सर, संतोष जावळे, रामदास धिवर, सुरेश शिंदे, गौरव भोसले, अण्णासाहेब गायकवाड, विष्णू ठोंबे, दिलीप त्रिभुवन, विशाल गायकवाड, वाघमारे, महेंद्र पवार, पोपट आरु, फ्रान्सिस शेळके, सुरेश आडसूळ इम्रान शेख, योगी सुरजनाथ, बुधनाथजी, भंते उपाली, नानासाहेब शिंदे, दिलीप मगरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


आंदोलकांनी केंद्रातील भाजप सरकार लोकशाही विरोधी व जातीयवादाला खतपाणी घालणारी असल्याचा आरोप करुन भाजप विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.ई.व्हि एम् विरोधी आंदोलन, राज्य घटनेने दिलेल्या अधिकाराची गळचेपी होत असल्याबद्दल,, मा वामन मेश्राम यांच्या बेकायदेशीर स्थानबद्धतेला विरोध, सर्व च मूल निवासी बहुजना वर होत असलेल्या अन्याय, अत्याचार विरोधी, व मूल निवासी बहुजनांचे हक्क, व अधिकार नष्ट करित असलेच्या विरोधी आंदोलन साठी
उत्तर प्रदेशासह इतर राज्यात भाजप सरकार संविधानद्रोह करत आहे. ओबीसी, आदिवासी, मागासवर्गीय यांना बळजबरीने हिंदू बनविण्यात येत असून, निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला. ओबीसी व इतर मागासवर्गीय यांची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले.


भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात चरणबध्द आंदोलन सुरु असून, प्रत्येक जिल्हास्तरावर आंदोलन करण्यात आले. 6 नोव्हेंबरला राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *