रिपाई युवक आघाडीचे मुख्यमंत्री यांना निवेदन
प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जातीयवादी प्रवृत्तीतून बोंडार हवेली (जि. नांदेड) येथील अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा व विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.

बोंडार हवेली (जि. नांदेड) गावातील बौद्ध तरुण अक्षय भालेराव यांचे गावातील सवर्ण समाजातील गावगुंडांनी गावात भीम जयंती साजरी करता का? असा प्रश्न विचारत तलवारीच्या साह्याने भोसकून निर्घूण हत्या केली. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना रोज घडत आहेत. अशा घटना घडवून बौद्ध समाजावर जातीयवादी प्रवृत्तीतून घडत असून, या समाजावर दहशत निर्माण केली जात आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना तात्काळ फाशी देण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश द्यावे, पिडीत कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे व त्यांना 25 लाख रुपयाची आर्थिक मदत राज्य शासनाच्या वतीने देण्याचीही मागणी रिपाई युवक आघाडीच्या वतीने केली आहे.