• Thu. Oct 16th, 2025

बाबुर्डी घुमट ग्रामपंचायतची डिजिटल ग्रामपंचायतच्या दिशेने वाटचाल

ByMirror

Aug 4, 2023

करवसुलीसाठी कॅशलेस सुविधेचा प्रारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट ग्रामपंचायत कॅशलेस कर वसुली करणारी हायटेक ग्रामपंचायत बनली आहे. ग्रामपंचायतीची करवसुली रोखीने न करता थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात पैसे जमा व्हावे व नागरिकांची देखील सोय होण्याच्या उद्देशाने बाबुर्डी घुमटची डिजिटल ग्रामपंचायतच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.


ग्रामपंचायतच्या क्यूआर कोडचा अनावरण सरपंच नमिता पंचमुख, उपसरपंच तान्हाजी परभाने व ग्रामसेविका नीलिमा बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला.


गावातील घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर वसुली करताना सुट्टे पैसे, आलेला कॅश भरणा परत ग्रामपंचायतच्या खात्यात टाकणे, सुट्टे पैश्‍यांची चणचण आदी विविध प्रश्‍न कॅशलेसच्या माध्यमातून सुटणार आहे. ग्रामपंचायतीने शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती एकाच छताखाली नागरिकांना डिजिटल पध्दतीने देण्याची तयारी सुरु असल्याची माहिती उपसरपंच तान्हाजी परभाने यांनी दिली. डिजिटलच्या युगात नागरिकांना डिजिटल सेवा पुरविणारी बाबुर्डी घुमट ग्रामपंचायत एक आदर्शवत ग्रामपंचायत ठरणार असल्याची भावना सरपंच नमिता पंचमुख यांनी व्यक्त केली.


ग्रामपंचायत डिजीटल होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य पवन लांडगे, ज्योती परभणे, वंदना चव्हाण, शहाबाई मुंजाळ यांनी विशेष प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *