अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल विघ्नहर्ता सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कु. आचल रामदास सोनवणे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सावेडी, टिव्ही सेंटर येथे झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक सल्लागार पै. योगेश सोनवणे पाटील, ज्ञानेश्वर कानडे, दत्तात्रय फटांगरे, सचिन तनपुरे, विशाल गायकवाड, विशाल म्हस्के, नंदकिशोर पेंडभाजे, अशोक कर्डिले आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पै. योगेश सोनवणे म्हणाले की, शेतकर्यांच्या आर्थिक विकासासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे धोरण महत्त्वाचे ठरते. शेतकर्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी नवीन संचालक मंडळाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या संचालकांच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जाणार असून, मोठा विश्वास सर्व मतदारांनी त्यांच्यावर टाकला असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना कु. आचल सोनवणे यांनी शेतकरी हितासाठी बाजार समितीच्या माध्यमातून कार्य करण्यात येणार आहे. सर्वांनी टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरुन चांगल्या पध्दतीने काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.