आमदार निलेश लंके यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकार्यांची उपस्थिती
भाविकांना महाप्रसादाचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्सव व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. बागडपट्टी येथे गुरुवारी (दि.6 एप्रिल) रात्री भाविकांसाठी सालाबादप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
बागडपट्टी येथील हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादाला आमदार निलेश लंके यांनी हजेरी लावली. आमदार लंके यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाला प्रारंभ करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, सूरज जाधव, अजय झिंजे, शंकर कंदी, बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर, उपाध्यक्ष किरण डफळ, कार्याध्यक्ष अजय दराडे, सचिव कुणाल गोसके, खजिनदार वरुण मिस्किन, सुरेश म्याना, विकी मेहेरा, गणेश जिंदम, जगदीश चिलवर, सचिन नराल, विनायक गोसके, योगेश विद्ये, राजू म्याना, नरेश चट्टेपेल्ली, पप्पू टोणे, सुनित म्याना, प्रविण ढापसे, सुमित गोसके, मयुर चिलवर, प्रितेश डफळ, किशोर लगडे, जस्मितसिंह, प्रशांत विद्ये, भरत जक्कल, नरेश मूनगेल, नाना आडेप, राजू कोडम, संतोष आडेप, प्रथमेश संभार, लाला सुपेकर, बबलू राजपूत आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी बागडपट्टी येथील श्री गणेशाची आरती करून उपस्थित पाहुण्यांनी श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी जय श्रीराम… जय हनुमान… चा भाविकांनी गजर केला.
आमदार निलेश लंके म्हणाले की, बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानचे धार्मिक व सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. प्रतिष्ठानचे सर्व युवा सदस्य सामाजिक कार्यात योगदान देत असून, वर्षभर सुरु असलेले उपक्रम कौतुकास्पद आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हे जुने शिवसैनिक असून, याच विचाराने त्यांचे कार्य सुरु असल्याचे सांगितले. तर आंम्ही दोघांनीही शिवसेनेत एकत्र काम केल्याचे स्पष्ट करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
विक्रम राठोड म्हणाले की, दिलदारसिंग बीर हे स्व. अनिल भैय्या राठोड यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. पण मधल्या काळात झालेल्या सर्व गोष्टींना विसरून या पुढे देश आणि धर्मासाठी एकत्र येऊन आंम्ही कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिलदारसिंग बीर यांनी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून युवकांना संघटित करुन वर्षभर धार्मिक व सामाजिक कार्य केले जात असल्याचे स्पष्ट केले. हनुमान जयंतीनिमित्त अनेक वर्षापासून महाप्रसादाची परंपरा सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.