वाहन चोरांना जेरबंद करुन केलेल्या कारवाईचे कौतुक
वाहन चोरांची दहशत मोडीत काढून पोलीसांनी समाधानाचे वातावरण निर्माण केले -संतोष जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत चोरी गेलेल्या वाहनांचा शोध घेऊन आरोपींना जेरबंद केल्याबद्दल बहुजन समाज पार्टीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी, नितीन रणदिवे, तपासी अधिकारी अनिल भोसले, फौजदार अनिल आढाव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, व्यापारी रवींद्र पुरी, रामभाऊ परदेशी, नंदू भिंगारदिवे, दीपक पवार, सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव आदी उपस्थित होते.
तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढले असताना पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून 24 वाहन हस्तगत करुन आरोपींना नुकतीच अटक केली. या कामगिरीचे कौतुक करुन बहुजन समाज पार्टीच्या वतीने पोलीसांचा सत्कार करुन त्यांना पेढे भरविण्यात आले. तर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे अभिनंदन करण्यात आले.
संतोष जाधव म्हणाले की, तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढले होते. सर्वसामान्य नागरिकांना वाहन चोरी जाण्याची मोठी भिती निर्माण झाली होती. या कारवाईने पोलीस प्रशासनाने वाहन चोरांची दहशत मोडीत काढून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले.