पंधरा दिवसात नव्याने नियुक्त होणार कार्यकारणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करत असल्याचे पत्रक बसपाचे पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी काळुराम चौधरी यांनी काढले आहे. तर नवीन कार्यकारणी येत्या पंधरा दिवसात नव्याने नियुक्त केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
बसपाचे राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अशोक सिद्धार्थ व नितीनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजने साहेब आदेशानुसार अहमदनगर जिल्हा कार्यकारणी बरखास्त करीत असल्याचे चौधरी यांनी पत्रात म्हंटले आहे.