अन पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती येथील शिक्षक शिवाजी किसन होले यांच्या मारेकर्यांचा शोध लावून यामधील तीन्ही सराईत गुन्हेगारांना जेरबंद केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) चे ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी सत्कार केला.
प्रा. शिवाजी होले यांची केडगाव बाह्यवळण रस्ता परिसरात लुटमारीच्या उद्देशाने आरोपींनी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. यामध्ये आरोपींचा लवकर शोध लागत नसल्याने केडगाव, नेप्ती, निमगाव वाघाच्या पंचक्रोशीत भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या शिताफीने आरोपींना जेरबंद केले. परिसर भयमुक्त झाले असून, या भागातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडल्याची भावना पै. नाना डोंगरे यांनी व्यक्त केली. अनिल कटके यांनी मारेकर्यांचा शोध घेताना आलेले अनुभव यावेळी विशद केले.