अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्राध्यापक सुनील उत्तमराव नागरगोजे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नागरगोजे हे तिलोक जैन माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक तर फिजिक्स विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शक होते. कायदे विषयाची पदवीही त्यांनी मिळविली होती.
समर्थ विद्यालयाच्या माध्यमिक शिक्षिका श्रद्धा नागरगोजे यांचे ते पती होते. तर क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य खजिनदार घनश्याम सानप यांचे ते मेहुणे होते. नागरगोजे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व आई असा परिवार आहे. त्यांच्या या अकस्मित जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.