आयुक्त व आमदारांना कृती समितीचे अधिकृत पत्र
पुतळा उभारणीचे सर्व अधिकार धारण करण्यासाठी 40 सदस्यांची समिती
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा वेस येथे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत महापालिकेत आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने नुकतीच बैठक पार पडली. फुले दांम्पत्यांच्या पुतळा उभारणीला वेग मिळावा व पुतळा उभारणीचे सर्व अधिकार धारण करण्यासाठी 40 सदस्यांची क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुले कृती समिती स्थापन करुन या समितीचे अधिकृत पत्र महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे व आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आले.

यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सचिव अशोक कानडे, सदस्य अनंत गारदे, अमित खामकर, डॉ. योगेश चिपाडे, दीपक खेडकर, अजय अवसरकर, जालिंदर बोरुडे, संतोष हजारे, अनंत पुंड, मळू गाडळकर, भरत गारुडकर, डॉ. प्रमोद तांबे, स्वाती सुडके, रेणुका पुंड, राणी अमृते, प्रियंका वाघ, कमलेश जंजाळे, श्रीकांत आंबेकर, भरत जाधव आदी उपस्थित होते.
महापालिकेत आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा माळीवाडा या ठिकाणी बसविण्यासाठी रविवारी (दि.13 नोव्हेंबर) बैठक पार पडली. या दांम्पत्याने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील केलेल्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा व त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळण्यासाठी करण्यासाठी फुले दांम्पत्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा आमदार संग्राम जगताप यांचे प्रयोजन आहे.

सदर बैठकीतील चर्चेनुसार समाजसुधारकांच्या पुतळ्या उभारणीच्या कार्याला वेग यावा आणि पुतळा उभारणीचे सर्व अधिकार धारण करणारी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सदर कृती समिती स्थापन करण्यासाठी सोमवारी (दि.14 नोव्हेंबर) नंदनवन लॉन येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत अध्यक्ष, सचिव यांचा समावेश असलेल्या 40 सदस्यांची क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुले कृती समिती स्थापन करण्यात आली असल्याचे पत्रात म्हंटले आहे.
फार चांगला उपक्रम आहे.हार्दीक शुभेच्छा.
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले.व ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांचे सरकार मान्य फोटो वापरावेत.क्रांतीसूर्य. महात्मा जोतीराव फुले यांचे नाव लिहीताना जोतीराव असे लिहावे