वक्तृत्व, समूह नृत्य, कविता लेखन, चित्रकला व मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेचा समावेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या वतीने 29 व 30 मे रोजी शहरात जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शासकीय परीचर्या महाविद्यालय जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे होणार असून, यावेळी वक्तृत्व व समूह नृत्य स्पर्धा रंगणार असल्याची माहिती नेहरु युवा केंद्राचे उपसंचालक शिवाजीराव खरात यांनी दिली.
या जिल्हास्तरीय युवा उत्सवामध्ये फक्त अहमदनगर जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. यामधील विजेत्यांना राज्य पातळीवर होणार्या युवा उत्सवासाठी पाठविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय युवा उत्सवामध्ये वक्तृत्व स्पर्धा व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामधील प्रथम क्रमांकास 5000 रुपये स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक 3000 रुपये स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकास 1000 रुपये तर कविता लेखन, चित्रकला स्पर्धा व मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा या दि 29 मे रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी अनुक्रमे प्रथम 1000, द्वितीय 750, तृतीय 500 रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र बक्षिस देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे नाव नोंदणीसाठी व इतर माहितीसाठी टिळक रोड येथील नेहरू युवा केंद्र कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर अधिक माहितीसाठी रमेश गाडगे 9850711389 किंवा राष्ट्रीय सेवाकर्मी दिनेश शिंदे 9579616484 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.