शेतकरी, हमाल, मापाडी व व्यापार्यांना पिण्यासाठी मोफत शुध्द पाण्याची व्यवस्था
पंचगंगा बियाणेचा सामाजिक प्रकल्प
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीमध्ये शेतकरी, हमाल, मापाडी व व्यापारी यांना शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. फिल्टर पाणी प्रकल्पाचे लोकार्पण सोमवारी (दि.21 नोव्हेंबर) आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. पंचगंगा बियाणे यांच्या सौजन्याने हा प्रकल्प उभारण्यात आला असून, नेप्ती उपबाजार समितीमध्ये सर्व घटकांना मोफत आर.ओ. फिल्टरचे शुध्द पाणी मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी मार्केट कमिटीचे प्रशासक किशन रत्नाळे, पंचगंगाचे संचालक प्रभाकर शिंदे, विजयकुमार बोरुडे, संतोष सूर्यवंशी, भास्कर महांडुळे, सुनील मिस्कीन, नंदकिशोर शिखरे, अनिल बजाज, अविनाश दळवी, भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, मोहन गायकवाड, हमालपंचायतचे संचालक गोविंद सांगळे, कैलास शिंदे, नामदेव डाके, संजय आवारे, हर्षल बोरा, दिलीप ठोकळ, बाजार समितीचे निरीक्षक जयसिंग भोर, नितीन ताठे, अभिजीत बोरुडे, गणेश बोरुडे, संग्राम सूर्यवंशी, विजय खोबरे, विकी वाघ, प्रकाश भंडारी, मोहम्मद वली आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात नंदकिशोर शिकरे यांनी बाजार समिती मधील सर्व घटकांना जारच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत होते. या पाणपोईमुळे चांगली व्यवस्था होऊन शुध्द पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी बाजार समितीच्या माध्यमातून स्वतंत्र्य पाण्याची लाईन उपलब्ध करुन देण्याची त्यांनी मागणी केली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, जिल्ह्यातून मोठी आवक नेप्ती उपबाजार समितीमध्ये होत असते. शेतकरी वर्ग आपला माल घेऊन बाजार समितीत येतो. यावेळी शेतकरी वर्ग, हमाल, मापाडी यांची तहान भागविताना त्यांना शुध्द पाणी मिळण्यासाठी व त्यांच्या आरोग्याची जाणीव ठेवून पंचगंगा ने उभारलेला प्रकल्प कौतुकास्पद आहे. या प्रकल्पातून उपबाजार समितीत येणार्याला शुद्ध पाण्याची व्यवस्था होणार आहे. नियोजनबद्ध पाणपोई उभारण्यात आली आहे. पाणी हा अत्यंत गरजेची गोष्ट असून, हा मोठा प्रश्न सोडविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


पंचगंगाचे संचालक प्रभाकर शिंदे म्हणाले की, शेतकरी सुखी तर जग सुखी या ब्रीदवाक्याप्रमाणे पंचगंगा ने योगदान दिले आहे. महाराष्ट्र व इतर राज्यात पाच प्रकल्प उभे करण्यात आले असून, यामध्ये अहमदनगर नेप्ती उपबाजार समितीचा समावेश आहे. शेतकरी वर्गाच्या सोयीसाठी व वर्षभर कष्टाचे काम करणार्या हमाल-मापाडी वर्गाची तहान शुध्द पाण्याने भागवली जाणार आहे. बाजार समितीने या प्रकल्पाला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल हा प्रकल्प यशस्वीपणे उभा करता आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर प्रकल्प उभा करण्याबरोबर त्याच्या देखरेखीची संपूर्ण जबाबदारी पंचगंगाने घेतली असल्याची माहिती दिली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद अहमदनगरला मिळाल्याबद्दल या स्पर्धेसाठी प्रयत्नशील असलेले आमदार संग्राम जगताप यांचा आडते असोसिएशनच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला.
नेप्ती उपबाजार समितीत शुध्द पाण्याने भागणार तहान
शेतकरी वर्ग, हमाल, मापाडी व व्यापार्यांना पाण्यासाठी बंद बाटली व जारचा आधार घ्यावा लागत होता. या सर्व घटकांना मोफत शुध्द पाणी मिळण्यासाठी पंचगंगा बियाणेच्या वतीने आर.ओ. फिल्टरचा प्रकल्प उभारण्यात आला असून, ताशी 500 लिटरची क्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून 24 तास पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
