सार्वजनिक स्वच्छता व मुलगी वाचवा मुलगी शिकवण्याचा संदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ग्रामस्थांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सावता महाराजांची आरती करून विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सावता महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून सार्वजनिक स्वच्छतेचा व कार्यक्रमातून मुलगी वाचवा मुलगी शिकवण्याचा संदेश दिला.
सावता महाराज मंदिरात महात्मा फुले यांच्या प्रतिमेभोवती करण्यात आलेल्या फुलांच्या आकर्षक सजावटीने ग्रामस्थांचे लक्ष वेधले. महात्मा फुले यांच्या प्रतिमेस समता परिषदेचे नगर तालुकाध्यक्ष रामदास फुले, माजी सरपंच अंबादास पुंड, प्रा. भाऊसाहेब पुंड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समता परिषदेचे शाखाध्यक्ष शाहूराजे होले, वसंत पवार, भानुदास फुले, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड, संतोष चौरे, रोहिदास भुजबळ, सिताराम पुंड, तुषार भुजबळ, नानासाहेब बेल्हेकर, बालनाथ पुंड, संतोष लोंढे, नितीन पुंड, कुणाल शिंदे, संतोष बेल्हेकर, तेजस नेमाने, सार्थक होले, नितीन शिंदे, मिलिंद होले, रमेश रावळे, हर्षल चौरे, सुमन भुजबळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड, मंगल फुले, रोहिणी पुंड, बापूशेठ पुंड, विनायक बेल्हेकर, सागर शिंदे, राजू शिंदे, यमुना पुंड आदी उपस्थित होते.

प्रा .भाऊसाहेब पुंड यांनी महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून सार्वजनिक स्वच्छतेचे आव्हान केले. तर मुलगी वाचवा मुलगी शिकवाचा त्यांनी संदेश दिला.
रामदास फुले म्हणाले की, रूढी परंपरेने बरबटलेल्या संस्कृतीत महिलांना मानाचे स्थान नव्हते. महात्मा फुलेंनी महिलांना शिक्षणाचे दार उघडे करून त्यांना समाजात सन्मान मिळवून दिला. आज विविध क्षेत्रात स्त्रिया आपले कर्तृत्व गाजवीत असून, त्याचे श्रेय महात्मा फुलेंना जाते. त्यांनी आपले आयुष्य बहुजन समाजाच्या कल्याणासाठी वेचले. त्यांची जयंती साजरी करताना त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले .