गावात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक व क्रीडा चळवळ रुजविण्याचे काम डोंगरे यांनी केले -रुपाली जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य दिपक गायकवाड यांच्या हस्ते डोंगरे यांचा सत्कार झाला. यावेळी सरपंच रुपाली जाधव, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, डॉ. विजय जाधव, गणेश येणारे, पिंटू जाधव, किसन कदम, दिपक जाधव, नवनाथ फलके आदी उपस्थित होते.
सरपंच रुपाली जाधव म्हणाल्या की, गावात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक व क्रीडा चळवळ रुजविण्याचे काम पै. नाना डोंगरे यांनी केले. गावातील युवकांना दिशा देण्याचे काम करुन कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तर अनेक पुरस्कार प्राप्त करुन निस्वार्थ भावनेने सामाजिक योगदान देणारे डोंगरे गावाचे भूषण असल्याचे त्यांनी सांगितले. दिपक गायकवाड म्हणाले की, ग्रामपमंचायतचे सदस्य असलेले डोंगरे यांची विविध क्षेत्रात योगदान देत आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असून, राजकारणातील समाजकारणी व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, गावासह नगर तालुक्यातील खेळाडूंना पुढे आणण्याचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. युवकांमध्ये खेळाडूवृत्ती वाढीस लागण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गावात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून कुस्तीबरोबरच इतर मैदानी खेळ गावात घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.