• Thu. Mar 13th, 2025

निमगाव वाघात हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा

ByMirror

Apr 6, 2023

लाल मातीच्या आखाड्याचे पूजन

ग्रामस्थांची दर्शनासाठी गर्दी

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) गावात हनुमान जन्मोत्सव सोहळा गुरुवारी (दि.6 एप्रिल) विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात पार पडला. हनुमान मंदिरामध्ये पहाटे विधिवत पूजा व आरती करण्यात आली. तर कीर्तनामध्ये भक्तीरसात भाविक तल्लीन झाले होते.


युवा किर्तनकार ह.भ.प. अक्षय महाराज उगले यांनी रामभक्त हनुमानजींच्या भक्ती व शक्तीवर उजाळा टाकला. दिवसभर भाविकांनी हनुमानजींच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांना यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.


धार्मिक कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर भेट देऊन ग्रामस्थांना हनुमान जन्म सोहळ्याचे शुभच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, अण्णा जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, गोकुळ जाधव, अनिल डोंगरे, नेप्तीचे माजी सरपंच संजय जपकर, पिंटू जाधव, अतुल फलके, तुकाराम फलके, कचरु कापसे, भाऊसाहेब कापसे, चंद्रभान जाधव, गणेश कापसे, अरुण कापसे, गोरख फलके, दत्तात्रय फलके, श्याम जाधव, किरण जाधव, पै. संदिप डोंगरे, भरत बोडखे, जालिंदर आतकर, भागचंद जाधव, अजय ठाणगे, पोपट भगत, प्रमोद जाधव, बाबा गायकवाड, सुरेश जाधव, गोरख गायकवाड, छगन भगत, संभा पाचारणे, पै. गणेश फलके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तसेच गावातील सार्वजनिक व्यायाम शाळेत बजरंगबली की जय…म्हणत लाल मातीच्या आखाड्याचे नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *