ग्रामपंचायतच्या वतीने परिवहन महांडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयास निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मुक्कामी सुरु असलेली नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा सुरु ठेऊन नव्याने सकाळी व संध्याकाळी नगर ते दैठणे गुंजाळ ही अधिकची बस सेवा सुरु करण्याची मागणी निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने परिवहन महांडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी विभाग नियंत्रक कार्यालयास दिले. निवेदनावर सरपंच लता फलके व ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड यांच्या स्वाक्षर्या आहेत.
नगर ते दैठणे गुंजाळ मुक्कामी बस व नगर-पारनेर-निमगाव वाघा वरून जाणारी बस नियमित सुरू ठेवावी. त्या व्यतिरिक्त गावातील विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती व ग्रामस्थांच्या सोयीसाठी सकाळी 10 वाजता व संध्याकाळी 5 वाजता नगर ते दैठणे गुंजाळ बस सुरू करण्याची मागणी निमगाव ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.