गावात धार्मिक एकतेचे दर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांनी श्री रामचंद्रांच्या प्रतिमेला पाळण्यात टाकून जन्मोत्सवाचे गीत सादर केले. गावात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण त्रितपपूर्ती सोहळ्यात श्री राम जन्मोत्सव रंगला होता. या सोहळ्यासाठी गावातील सर्व धर्मियांनी हजेरी लावल्याने धार्मिक एकतेचे दर्शन घडले.
गावातील नवनाथ मंदिरात असलेल्या राम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी विधीपूर्वक पूजा अर्चना झाली. तर हरिपाठ, भजन कीर्तन व प्रवचन पार पडले. किर्तनकार ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर यांचे श्री रामचंद्रांच्या जन्मावर सुश्राव्य किर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यांनी श्रीराम जन्माचे चरित्र आपल्या वाणीतून विशद केले.

कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मिराबाई बोडखे, आशाबाई ठाणगे, विणा बोडखे, लक्ष्मी जाधव, कार्तिक बोडखे, द्रोपदा कापसे, तेजस्विनी डोंगरे, अनिता बोडखे, अनुसया डोंगरे, लता फलके, कांचन डोंगरे, मंदा डोंगरे, संगिता फलके, परिगा निमसे, प्रियंका डोंगरे-ठाणगे, मारुती फलके, बापू फलके, बन्सी जाधव, एकनाथ डोंगरे, वसंत फलके, मंगल वाघुले आदी उपस्थित होते.