गावात निनादला टाळ-मृदंगाचा गजर, पखवाजाचे बोल आणि विठोबा रखुमाईचे भजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण त्रितपपूर्ती सोहळा भक्तीमय वातावरणात रंगला आहे. या धार्मिक सोहळ्यात वारकरी, ग्रामस्थ भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरणात तल्लीन होत आहे. टाळ-मृदंगाचा गजर, टाळ्यांची साथ, पखवाजाचे बोल आणि विठोबा रखुमाई भजनाचे बोल गावात गुंजू लागले आहेत.
या सोहळ्यामध्ये ह.भ.प. विकासानंद महाराज मिसाळ यांचे कीर्तन रंगले होते. त्यांनी देवाचे रुप व त्याच्या अस्तित्वाचा उलगडा केला. देवाचे अनेक रुप आहेत. देव तुम्ही कशात पहाता? या प्रश्नाचा उलगडा करताना त्यांनी भगवंताची व भक्तीचे विविध दाखले देत सजीव सृष्टीत देव असल्याचे स्पष्ट केले. तर देव सर्व सृष्टीत असून, गरजूची गरज भागवणे, तहानलेल्याची तहान तर भुकेल्याची भूक भागवणे हाच खरा परमार्थ आहे. देव पाहिजे असेल तर, देवालाच जीवनात महत्त्व देण्याचे त्यांनी सांगितले.

कीर्तनानंतर नवनाथांची आरती पार पडली. या आरतीचा मान ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, अंबादास ठोकळ, नारायण शिंदे, प्रा. रंगनाथ सुंबे, रावसाहेब भोर, जगन्नाथ गायकवाड, सुर्यभान गावखरे, राजेंद्र पवार, गोरख तरटे, बापू पुंड, बबन जाधव, ऋषीकेश बोडखे, संदेश जाधव, माऊली बोडखे यांना देण्यात आला होता.
यावेळी उत्तम देवकर, ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर, पोपट कार्ले, सुभाष रासकर, गोकुळ जाधव, अवि एडके, नवाब शेख, सुभाष देवकर, तुकाराम देवकर, मच्छिंद्र मिसाळ, मच्छिंद्र कापसे, मनोज कार्ले, सुनिल जाधव, प्रमोद जाधव, भरत बोडखे आदी उपस्थित होते. समारोपप्रसंगी महाप्रसादाचे वाटप झाले.