ग्रामपंचायत मधील कर्मचार्यांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आला.

प्रारंभी नवनाथ विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात अनुक्रमे सेवानिवृत्त शिक्षक काशीनाथ पळसकर, सरपंच रुपाली जाधव, माजी सैनिक रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, दिपक जाधव, नवनाथ फलके, सोमनाथ आतकर, माजी सैनिक रामदास कदम यांचा सत्कार केला.
यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे, भागचंद जाधव, नामदेव फलके, दादा गायकवाड, प्राथमिकचे मुख्याध्यापक किशोर शिंदे, किरण सांगळे, विजय शिंदे, वर्षा औटी, शकुंतला गव्हाणे, सरस्वती गुंड, राणी पाटोळे, किरण जाधव, अण्णा जाधव, डॉ. विजय जाधव, चंद्रकांत पवार, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, अतुल फलके, संदिप डोंगरे, अरुण कापसे, उत्तम कांडेकर, तुकाराम खळदकर, प्रतिभा डोंगरे, मयुर काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पै. नाना डोंगरे यांनी ग्रामपंचायत मधील कामगार वर्गाला कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मा झालेल्यांना आदरांजली वाहिली. श्रमिक कामगारांमुळे महाराष्ट्र व देशाची विकासात्मक वाटचाल सुरु असल्याचे सांगितले.