• Thu. Mar 13th, 2025

निमगाव वाघात ज्येष्ठांची मोफत नेत्र तपासणी

ByMirror

May 13, 2023

छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचा उपक्रम

महापुरुषांच्या विचाराने समाज कार्य करण्याची गरज -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, स्वस्तिक नेत्रालय व वैष्णवी ऑप्टीकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच साहेबराव बोडखे यांच्या हस्ते झाले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, नेत्रतज्ञ डॉ. वैष्णवी जरबंडी, डॉ. ओंमकेश कोंडा, लक्ष्मण चौरे, पिंटू जाधव, नेप्तीचे माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, दिगंबर जाधव, अनिल डोंगरे, माधव वाबळे, अशोक खळदकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, निलम काळे, गोकुळ जाधव, दादाभाऊ येणारे, भास्कर जाधव, संजय जरबंडी, प्रतिभा डोंगरे, प्रमोद जाधव, भिमराज वाबळे, अण्णा जाधव, प्रशांत जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, महापुरुषांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी झाल्यास गरजू घटकांना मोठा आधार मिळणार आहे. सर्वच महापुरुषांनी समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले. आज त्यांच्या विचाराने समाज कार्य करण्याची गरज आहे. महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना खर्चिक आरोग्य सुविधांचा खर्च पेळवत नाही. मोफत आरोग्य शिबिर सर्वसामान्यांना नवसंजीवनी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सरपंच साहेबराव बोडखे यांनी राजकारण न करता समाजकारणातून सेवाभावाने सुरु असलेल्या योगदानाचे कौतुक केले.


गावातील नवनाथ मंदिरात झालेल्या या शिबिरात नेत्रतज्ञ डॉ. ओंमकेश कोंडा व डॉ. वैष्णवी जरबंडी यांनी नेत्र तपासणी केली. या शिबिरात अद्यावत यंत्र सामुग्रीद्वारे तपासणी करुन पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरातील गरजू लाभार्थींवर संबधित डॉक्टर अल्पदरात पुढील उपचार करणार आहेत. या उपक्रमास नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *