ग्रामपंचायतचा उपक्रम
दिव्यांगांना प्रवाहात आणणे सर्वांचे कर्तव्य -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतच्या वतीने गावातील 26 दिव्यांग बांधवांना बसण्यासाठी खुर्च्याचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत मधून 5 टक्के निधी दिव्यांग बांधवांसाठी खर्च करुन हा उपक्रम राबविण्यात आला.
या साहित्याचे वितरण दिव्यांगांना ग्रामपंचायतच्या मासिक सभेत करण्यात आले. यावेळी उपसरपंच अलका गायकवाड, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, दिपक गायकवाड, किरण जाधव, ज्ञानदेव कापसे, अरुण कापसे, अजय ठाणगे, दिपक जाधव, नवनाथ फलके, सोमा आतकर, संजय पुंड, अंकुश आतकर, संभाजी गायकवाड, कैलास काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, अपंगत्वावर मात करीत अनेक दिव्यांग बांधव जीवन जगत आहे. त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी ग्रामपंचायत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे. दिव्यांग समाजातील एक घटक असून, त्यांना प्रवाहात आणणे सर्वांचे कर्तव्य आहे. दिव्यांगांना सहानुभूतीची गरज नसून, प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतच्या वतीने दर आर्थिक वर्षात 5 टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्यात येतो. कोरोना काळात देखील दिव्यांगांना किराणा किटचे वितरण करण्यात आले होते. बसण्याची सोय होण्याच्या भावनेने ग्रामपंचायतने दिव्यांगांना खुर्च्या उपलब्ध करुन दिल्या असल्याची माहिती उपसरपंच अलका गायकवाड यांनी दिली. या उपक्रमासाठी सरपंच रुपाली जाधव, प्रमोद जाधव, मुन्नाबी शेख, सुजाता कापसे, उज्वला कापसे, संजय कापसे, लता फलके यांचे सहकार्य लाभले.