रिपाई युवक आघाडी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीने अभिवादन
अण्णाभाऊंनी शाहिरी व साहित्यातून उपेक्षितांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय देण्याचे काम केले -विवेक भिंगारदिवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबोडी (ता. नगर) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीने जयंती उत्सवानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गावात सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपाई युवकचे जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, नगर तालुका कार्याध्यक्ष कृपाल भिंगारदिवे, रिपाई मातंग आघाडीचे नगर तालुकाध्यक्ष अर्जुन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग शेंडगे, अण्णाभाऊ साठे फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन शेंडगे, लहुजी ग्रुपचे संस्थापक राहुल शेंडगे, एकलव्य संघटनेचे संपर्क प्रमुख शंकर माळी, मच्छिंद्र गांगर्डे, वैभव बनसोडे, प्रथमेश शेंडगे, लखन शेंडगे, राम शेंडगे, सुरेश साबळे, मच्छिंद्र शेंडगे, अशोक इंगळे, विश्वराज भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
विवेक भिंगारदिवे म्हणाले की, समाज जागृत करण्याचे काम अण्णाभाऊंनी केले. आपल्या शाहिरी व साहित्यातून त्यांनी उपेक्षितांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे विचार युवकांना प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. कृपाल भिंगारदिवे यांनी अण्णाभाऊ साठे केवल लोकशाहीर नव्हे, तर ते दर्जेदार साहित्यिक होते. त्यांनी आपल्या साहित्यातून जनजागृतीचे कार्य केले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊंचे योगदान स्फुर्तीदायी असल्याचे त्यांनी सांगितले.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….