• Wed. Oct 15th, 2025

नारायणगव्हाण हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार व आरोपींना तात्काळ अटक व्हावी

ByMirror

Jun 26, 2023

आंबेडकरी चळवळीतील सामाजिक संस्था व राजकीय पक्षांची मागणी

शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन दिले निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- एकतर्फी प्रेमप्रकरणातून युवकाची आत्महत्या व त्यानंतर सुढ भावनेने मुलीच्या वडिलांची नारायणगव्हाण (ता. पारनेर) येथे झालेल्या हत्या प्रकरणात कटकारस्थान रचणार्या व मुख्य आरोपींना तात्काळ अटक व्हावी व हत्या झालेल्या गायकवाड कुटुंबीयांच्या सदस्यांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि.26 जून) आंबेडकरी चळवळीतील सामाजिक संस्था व राजकीय पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. कामगार
यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण आंधळे, सरपंच राजेंद्र शेळके, सुरेखा गायकवाड, बहुजन क्रांती मोर्चाचे राजेंद्र करंदीकर, रिपाई युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमित काळे, रिपाई (गवई) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, पीपल्स रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे राजेंद्र उबाळे, किरण सोनवणे, संभाजी ब्रिगेडचे सुदाम कोरडे, सोमा शिंदे, दया गजभिये, राष्ट्रीय किसान मोर्चाचे बाळासाहेब पातारे, आयुब शेख, अशोक पंडित, सुभाष गायकवाड, मनोज सुर्यवंशी, अजय पाखरे, संदीप वाघचौरे आदी उपस्थित होते.


संतोष बबन गायकवाड यांची नारायणगव्हाण (ता. पारनेर) मध्ये कटकारस्थान करून निर्घूणपणे हत्या करण्यात आली. या हत्याकांडचे कारस्थान करणारा तसेच जाणीवपूर्वक नियोजन पद्धती सूत्रधार अजिंक्यतारा विष्णू दरेकर व इतर दोन गुन्हेगार यांना अद्याप अटक झालेली नाही. सदर गंभीर घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी गुन्हेगार मोकाट फिरत आहे. हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार अजिंक्यतारा विष्णू दरेकर असून, त्याने नारायणगव्हाण परिसरातील अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे वळवून त्यांची एक टोळी निर्माण केली आहे. या टोळीचा वापर परिसरात दहशत निर्माण करणे, अवैध धंदे चालविणे, रस्ता लूट, गोरगरीबांना मारहाण करणे, खंडणी उकळणे असे अनेक गुन्ह्यासाठी वापर केला जात आहे. तसेच टोळीतील मुलांचा वापर करून अल्पवयीन मुलींना फुस लावणे त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकून फोटो व व्हिडिओ काढून मुलींना आणि त्यांच्या आईवडिलांना ब्लॅकमेल करण्याचे गुन्हे केले जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


या खूनातील आरोपी असलेला अट्टल गुन्हेगार व इतर मोकाट फिरत असल्यामुळे दिवंगत संतोष गायकवाड यांच्या कुटुंबीयांचा जीव देखील धोक्यात आहे. त्यांचा देखील घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवंगत संतोष गायकवाड यांचे वडील बबन गायकवाड हे भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार असून, त्यांची 1965 भारत-पाकिस्तान मध्ये सहभागी होऊन अंगावर गोळ्या झेललेल्या आहेत. देशभक्त माजी सैनिकाच्या कुटुंबाला आरोपींनी वेळोवेळी त्रास दिला आहे. कुटुंबातील कर्त्या मुलाचे हत्याकांड घडवून आणले आहे, तरी देखील या हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार मोकाट फिरत आहे ही प्रशासनाच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार व इतर गुन्हेगारांना ताबडतोब अटक करावी, आरोपींची संघटित गुन्हेगारीची पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा कलमचा गुन्ह्यात समाविष्ट करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे. अन्यथा 28 जून रोजी दिवंगत गायकवाड यांच्या जलदान विधी कार्यक्रमाच्या दिवशी नारायणगव्हाण येथे ग्रामस्थ, विविध संघटना व राजकीय पक्षाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *