• Thu. Jan 29th, 2026

नवीन वर्षी ऊस तोडी कामगार व आदिवासी समाजातील मुलांना कपड्यांची भेट

ByMirror

Jan 1, 2023

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचा सामाजिक उपक्रम

वंचित घटकातील लहान मुलांच्या चेहर्‍यावर फुलवले आनंद

अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने नवीन वर्ष ऊस तोडी कामगार व आदिवासी समाजातील मुलांना नवीन कपड्यांची भेट देऊन साजरा करण्यात आला. नवीन वर्षी कपड्यांची भेट मिळाल्याने वंचित घटकातील लहान मुलांच्या चेहर्‍यावर आनंद फुलले होते.


सर्वत्र नवीन वर्षाचा जल्लोष साजरा होत असताना पालामध्ये मळकटलेल्या कपड्यांनी दैनंदिन जीवन जगणार्‍या मुलांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांनी मायेने जवळ घेऊन ही अनोखी भेट दिली.

जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथील श्री सिद्धनाथ दत्त मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष रोहिदास महाराज जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग, शहराध्यक्ष दिलीप साळवे, राहुरी तालुका अध्यक्ष प्रकाश देठे, जामखेड तालुकाध्यक्ष भिमराव मुरूमकर, दत्त मंदिराच्या संचालिका कलावती जाधव, यशश्री स्कूल दौंडचे चेअरमन ओमप्रकाश जाधव आदी उपस्थित होते.


रोहिदास महाराज जाधव यांनी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन मानवी न्याय, हक्कावर काम करताना वंचित घटकातील मुलांना आधार देण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले. विजय भालसिंग म्हणाले की, वंचित घटकातील मुले उद्याच्या भारताचा उज्वल भविष्य आहे. त्यांना शिक्षणासाठी व दैनंदिन प्रश्‍न सोडविण्यासाठी सहकार्य केल्यास समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिलीप साळवे यांनी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या माध्यमातून समाजकारण हा एकमेव उद्दीष्ट समोर ठेऊन कार्य केले जात आहे. वंचितांना प्रवाहात आणण्यासाठी सर्व पदाधिकारी योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *